पुणे : बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात परवापासून मान्सून पुन्हा सुरु झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं काल जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागनं राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अॅलर्ट जारी केले होते.
पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडले असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीन-चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काल म्हणजेच 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. 40 दिवसांत मान्सूनने संपूर्ण भारताचा प्रवास केला. दिल्लीत तब्बल 19 वर्षांनंतर मान्सून उशिराने दाखल झाला असून याआधी 2002 साली मान्सून 19 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- आता रशियन स्पुतनिक-व्ही लस पुण्याच्या सिरममध्ये होणार तयार !
- ‘शिवसेनेलाच आता युतीची गरज असेल’; निलेश राणेंचा टोला
- पुणेकरांना दिलासा : कोरोनामुक्तांच्या आकड्यात वाढ ! आजही सक्रिय रुग्णांमध्ये झाली घट
- नाना पटोलेंसारख्या जबाबदार व्यक्तीने बेताल वक्तव्य करू नये; सुनिल शेळकेंनी सुनावलं
- आघाडीतील तणाव निवळण्यासाठी पवारांच्या दरबारात काँग्रेससोबत वाटाघाटी ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

