Share

आता रशियन स्पुतनिक-व्ही लस पुण्याच्या सिरममध्ये होणार तयार !

Published On: 

पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्र सरकार विविध लसींना मान्यता देत आहे.

तर, सध्या उपलब्ध असलेल्या लसींपैकी सर्वाधिक परिणामकारी स्पुतनिक-व्ही या लसीबाबत अनेक नागरिक हे उत्सुक होते. रशियन बनावटीची ही लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजतर्फे देशभरात वितरित केले जात असून केवळ खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध आहे. या लसीसाठी मागणी देखील मोठी असून आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या सप्टेंबरपासून सीरम इन्स्टिट्यूट रशियाची कोरोनावरील लस स्पुतनिक व्हीचे उत्पादन सुरू करणार आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं सांगण्यात येत आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) स्पुतनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. यानंतर cultivation process सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष मिळून म्हणजे RDIF (Russian Direct Investment Fund) आणि सीरम इन्स्टिट्यूट हे देशात तब्बल ३० कोटी स्पुतनिक लसीचे डोसचे उत्पादन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!