Share

पवार साहेब हे मौल्यवान रत्न; पडळकर, राजकारण बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याची टीका

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

पडळकरांनी फडणवीसांना विचारावे, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यावर काय होते?

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे. मनसेच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे गोपीचंद पडळकर यांना राजकारणाला बदनाम न करण्याचे आवाहन केले आहे.राजकारणातील एवढी नीच पातळी गाठून मिळणार काय, असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये पाटील म्हणाल्या, आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले मौल्यवान रत्ने आहेत.

रुपाली पाटील पुढे म्हणाल्या की, शरद पवार राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. तसेच राजकारणात त्यांची पूर्ण हयात गेली आहे, आणि कालचा झालेला आमदार जर अशी घाणेरडी टीका करत असेल तर हे अशोभनिय आहे, असं रुपाली पाटील यांनी सांगितले.

सिंचनाची सोय असलेल्या शेतक-यांनी कापूस पिकासोबत गहू पिकाच्या वाणाची लागवड करावी

टीका विचारांची देवाण घेवाण वेगळी, विरोधक म्हणून टीका ही मान्य आहे. पण अशी पातळी सोडणे म्हणजे विकृती आहे. त्यामुळे एवढा नीचपणा राजकारणात आणून राजकारण अजून बदनाम करु नका. तुम्हाला बिरुबाची शपथ आहे, असा सल्ला रुपाली पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!