बंगळुरु : जगात आणि आता त्यानंतर देशात कोरोनाची संख्या वाढत आहे. जगभरातील ८० लाखांहून अधिक तर भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाखांच्या वर पोहचला आहे. जगभरात ३ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बंगळुरुमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. म्हणून मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘राज्यातील जनतेनं सोशल डिस्टेंसिंगच पालन करावं, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल. त्यात सर्वकाही बंद करण्यात येईल’.
आज मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी बंगळुरुमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. व्यवस्था करुन ठेवली आहे पण बंगळुरुमध्ये वाढणारे रुग्ण चिंताजनक आहेत. त्यामुळे लोकांना आवाहन आहे की, सोशल डिस्टेंसिंगचं तंतोतंत पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
But we are also thinking about the number of cases which is increasing in Bengaluru. I urge people to maintain social distancing and sanitisation if Bengalurians don't want one more seal down: Karnataka Chief Minister BS Yediyurappa https://t.co/K5TXkA9UIG
— ANI (@ANI) June 25, 2020
दरम्यान , कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कर्नाटकात भाजपचा पराभव ही हुकूमशाही व मनमानीच्या अंताची सुरुवात – राऊत
मुंबईत कोरोनाचा हाहाकार; शिवसेनाभवन पुढील काही दिवस बंद राहणार
अखेर लंगोट आणि धोतर नेसणाऱ्यांनीच कोरोनावर औषध आणलं – रामदेव बाबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

