Share

नक्षलवादाशी लढायचंय, १२०० कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी

Published On: 

नवी दिल्ली : आज केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आहेत. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याला नक्षलवादाशी लढण्यासाठी १२०० कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने नक्षलवाद आणि माओवादासारख्या देशविरोधी घटकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे धोरण ठरवत असून, यामध्ये राज्यांनाही विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी देशातील नक्षल आणि माओवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला नक्षलवादाशी लढण्यासाठी १२०० कोटी रुपयांची गरज असून, गृहमंत्रालयाने ही मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरेंशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित आहेत. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री ओमाना चांडी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!