🕒 1 min read
धुळे : ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय. यापुढेही अनेक अडचणी येणार आहेत मात्र आपण हा लढा निकराने लढायचा आहे. असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले. धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, सध्याचा काळा हा ओबीसींच्या संक्रमणाचा, परीक्षा घेणारा काळ आहे. मात्र आपल्याला त्यावर मात करत पुढं जावं लागणार आहे. त्यासाठीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केल्याचे ते म्हणाले. गोरगरिबांचे दु:ख कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून काम करायचे आहे. देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. त्यामुळे हा त्रास होणारच आहे. ज्यांनी ज्यांनी हे काम हाती घेतले त्यांना त्रास देण्याचे काम यापूर्वीही झाले आहे. असेही भुजबळ म्हणाले.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महापुरुष आपली दैवत आहे. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना समाजात महत्वाचे स्थान मिळवून दिले. प्रगत शेती आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची कल्पना त्यांनी त्या काळात मांडली. जाती व्यवस्था मोडण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. महात्मा फुलेंनी शिक्षण द्या आणि काम वाटून घ्या हेच आरक्षण आहे. असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव
- मनिष पांडेनं भर मैदानात केले ‘हे’ कृत्य; सगळीकडे होतेय थू-थू ची चर्चा
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
