Share

बारा मतदारांचे जाहीर आभार; पट्ठ्यानं लावलेला बॅनर होतोय व्हायरल

Published On: 

पुणे : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडलं होतं. या निवडणुकांचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी अधिक सक्रिय सहभाग घेतल्याने या निवडणूका नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या.

या निवडणुकांमध्ये कुठं सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले, सासू-सुना एकमेकींच्या विरोधात उभ्याठाकल्या तर कुठं नवऱ्या विरुद्ध बायकोनेच कंबर कसल्याचं दिसून आलं होतं. निवडणुकांनंतर लागलेल्या निकालांची देखील चर्चा सद्या जोरात रंगली आहे. साधारणतः नवरा आपल्या बायकोला निवडणुकीत उभं करतो आणि जिंकल्यावर उचलून घेत विजय साजरा करतो. मात्र, एका गावात बायकोनेच आपल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घेत विजय साजरा केला. कारभारी लय भारी या मथळ्याखाली ही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाली आहे.

आता, विकास शिंदे कोनाळीकर या युवा उमेदवाराने ग्रामपंचायत निकाल जाहीर झाल्यानंतर बॅनर लावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत हार पत्करल्यानंतर या पट्ठ्यानं लावलेला बॅनर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. ‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा…पण तुम्ही म्हणाले पसारा भरा. आम्ही जातो आमच्या गाव आमचा राम-राम घ्यावा, समाजाने धिक्कारलं, गावानं नाकारलं…पण आम्हाला आमचा देश स्वीकारणार’ असं म्हणत या तरुणाने अपयशामुळे खचून न जाता आपली वाटचाल कायम ठेवण्याचा इरादा देखील स्पष्ट केला आहे.

तब्बल १२ मतदारांनी दिलेल्या अमूल्य मताची जाण राखत या उमेदवाराने त्यांचे आभार देखील मानले आहेत. ‘आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बारा मतदारांचे जाहीर आभार! ज्यांनी मला बारा मते देऊन संघर्ष करण्याची ताकद दिली, त्यांचे उपकार सात जन्मही फिटणार नाहीत. तुमच्या मतांचं देशात नावचं करीन’ असा दृढनिश्चय देखील विकास शिंदे कोनोळीकर या युवा उमेदवाराने केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!