🕒 1 min read
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि पारदर्शक वातावरणात अलीकडेच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुका आणि त्यामधील मतदारांचा सहभाग हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.
जम्मू कश्मीर वासियांसाठी आयुष्यमान भारत पीएम-जय सेहत योजनेचा प्रारंभ काल त्यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते.जम्मू कश्मीर मधील नागरिकांनी, थंडी आणि कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत सहभाग घेवून लोकशाही मजबूत केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
ग्राम स्वराज्याचं महात्मा गांधीजींचं स्वप्न जम्मू काश्मीरने साकारलं असून या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘या’ देशाने सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात आढळून आले १६ जण कोरोना पॉझिटिव्ह
- नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज : अजित पवार
- सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका : भाजपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
