Share

नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘या’ देशाने सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले

Published On: 

नवी दिल्ली : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता आठ कोटींच्या वर गेली असल्याचं, अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं सांगितलं आहे. सध्या जगातल्या कोरोना बाधितांची संख्या आठ कोटी सत्तर हजार तीनशे सत्तावीस इतकी झाली असून मृतांची संख्या सतरा लाख त्रेपन्न हजार आठशे एकोणचाळीस नोंदली गेली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका अद्यापही अव्वल क्रमांकावर आहे.

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार आहे.जपानी नागरिकांना देशात प्रवेश करण्यापूर्वी ‘कोविड निगेटिव्ह’ असल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य करण्यात आलं असून देशात प्रवेश केल्यानंतर पुन्हा कोविड चाचणीला सामोरं जायचं आहे. जपानमध्ये कोविड-19 चे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

दरम्यान, इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.( त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!