Share

मला पोलीस सुरक्षेची गरज नाही, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राला त्यांची अधिक गरज : विनोद तावडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  कोरोनाचं संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रावर सध्या भीषण संकट आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने काही आदेश दिले आहेत. जनतेने आदेशाचं उल्लंघन करू नये यासाठी सध्या पोलिस दिवसरात्र मेहनत करत आहेत. पोलिसांवर कायद्याचं पालन व्हावं यासठी अधिकच ताण आहे. अशा परिस्थितीत मला सध्या पोलिस सुरक्षा नको. माझी पोलिस सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती करणारं पत्र भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

संदर्भात विनोद तावडे म्हणाले गेल्या आठवड्याभरापासून राज्यावर आलेल्या संकटाच्या परिस्थितीत पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे. अशाही काळात नागरिक आपले कर्तव्य विसरून वागत आहेत. अशा वेळी पोलिसांवरचा ताण अधिकच वाढतो आहे. म्हणून मला पोलिस सुरक्षा नको असा निर्णय मी घेतला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पोलिस प्रयत्नांची शिकस्त करत आहे. या कामात मदत व्हावी म्हणून मी माझी पोलिस सुरक्षा काढून घेण्याची विनंती मुंबई पोलिस आयुक्तांना केली आहे, असंही तावडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील इतर नेत्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वत:ची सुरक्षा कमी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या जोरात वाढायला लागली आहे. रविवारी ७४ कोरोनाबाधित होते. आज हा आकडा वाढून तो थेट ९७  वर पोचहला आहे. यावरून गुणाकार स्वारूपात कोरोना पसरतो आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने अत्यावश्यक काम नसता घरात बसणं कर्मप्राप्त झालं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!