Share

विराटपूर्वी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंनी गाठलंय कसोटी शतक! वाचा कोण आहेत ते

Published On: 

नवी दिल्ली – भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आज एक मोठा कारनामा केला आहे. त्याने १०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे १०० कसोटी सामने खेळणाऱ्या दिग्गजांच्या यादीत तो सामील झाला आहे. मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध खेळताना विराटने हा विक्रम केला आहे.

असा कारनामा करणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरला आहे. तर जगातला ७१ वा, विराट अगोदर ११ भारतीय खेळाडूंनी १०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यामध्ये सचिन तेंडूलकरने तर चक्क २०० कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे भारताकडून सर्वात जास्त कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

आज आपण भारतासाठी १०० पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंची नावे पाहणार आहोत

१ ) सचिन तेंडूलकर – २०० कसोटी सामने 

२ ) राहुल द्रविड – १६३ कसोटी सामने

३ ) व्ही व्ही एस लक्ष्मण – १३४ कसोटी सामने

४ ) अनिल कुंबळे – १३२ कसोटी सामने

५ ) कपल देव – १३१ कसोटी सामने

६ ) सुनील गावसकर – १२५ कसोटी सामने

७ ) दिलीप वेंगसकर – ११६ कसोटी सामने

८ ) सौरव गांगुली – ११३ कसोटी सामने

९ ) इशांत शर्मा – १०५ कसोटी सामने

१० ) हरभजन सिंह – १०३ कसोटी सामने

११ ) वीरेंद्र सेहवाग – १०३ कसोटी सामने

१२ ) विराट कोहली – १०० कसोटी सामने

महत्वाच्या बातम्या – 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!