🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज आहेत. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एग्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते.
https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392
दरम्यान, यानंतर ट्विटर युजर्सने विवेक ओबेरॉयची चांगलीच कानउघडणी केली. भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने विवेक ओबेरॉयच्या ट्वीटला निराशाजनक आणि मूर्खपणाचे म्हटले आहे.
— Gutta Jwala ???? (@Guttajwala) May 20, 2019
मात्र विवेकचे हे ट्विट आल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. विवेक ओबेरॉयने विवेकशून्य ट्विट करून आपली अक्कल ठीकाण्यावर आहे का असा सवाल विचारण्यास भाग पडल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

