🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज आहेत. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एग्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते.
मात्र, हे मीम शेअर करण्यावरून अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर त्याने मंगळवारी सकाळी ते ट्विट त्याच्या ट्विटर हँडलवरून काढून टाकले. त्याचबद्दल घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाने त्याला नोटिसही बजावली होती.
Sometimes what appears to be funny and harmless at first glance to one, may not be so to others. I have spent the last 10 years empowering more than 2000 underprivileged girls, I cant even think of being disrespectful to any woman ever.
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 21, 2019
दरम्यान, पहिल्यांदा विवेक ओबेरॉयने या कृतीबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता. मी केवळ ते मीम शेअर केले होते. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा विषय नव्हता. केवळ हलका-फुलका विनोद होता, असे विवेक ओबेरॉयने म्हटले होते. पण अखेर मंगळवारी सकाळी त्याने पुन्हा एक ट्विट करून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. जर ते मीम शेअर करण्यामुळे एकाही महिलेला अपमानास्पद वाटले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
Even if one woman is offended by my reply to the meme, it calls for remedial action. Apologies???????? tweet deleted.
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 21, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

