Share

दिलासादायक! जालन्यात कोरोना रुग्णसंख्येत घट; ७०४ रुग्ण बरे होऊन गेले घरी

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र आता काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील असच काहीसे दिलासादायक चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ७०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. योग्य उपचाराने कोरोनावर मात करता येऊ शकते मात्र कोरोना होऊच नये या साठी नागरिकांनी काळजी घेणे आव्स्श्यक आहे.

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३०४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. जालना शहरात केवळ ४५ नवीन रुग्ण आढळून आले. मागील पंधरा दिवसांमधील ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असल्याने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या ६६१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये १३ जणांचा कोवीड संसर्गाने मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्या एकूण मृतांची संख्या आता ८१६ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळून आलेल्या बाधितांमध्ये जालना शहरासह तालुक्यातील ६३, मंठा तालुक्यातील १८, परतूर तालुका ३३, घनसावंगी तालुक्यातील २६, अंबड तालुक्यातील ४१ बदनापूर तालुक्यातील १३, जाफ्राबाद ५६, भोकरदन तालुक्यातील ३९, तर इतर जिल्ह्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ४९ हजार ११६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेेल्या ७०४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार ७३१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ६६१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ८१६ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात एकूण तपासण्यांमध्ये बाधित रुग्ण आढळू येण्याचे प्रमाण १६.५४ टक्के असून, बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.८९ टक्के इतके आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील ७२३ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!