सांगली: परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. गारपीटीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. रब्बी हंगामात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक हातून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
काल रात्री अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील पुर्णा, पालम, गंगाखेड, सेलु, तसेच परभणी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात काढणीला आलेला गहु, हळद, ज्वारी, चारा पीक पूर्णपणे आडवी झाली आहेत. तर नुकतेच वाढ होत असलेल्या मोसंबी, आंबा, आदी फळपिक ही गळुन पडल्याने हजारो हेक्टर वरील नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘राज्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषि विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा कृषि क्षेत्राला बसत असणाऱ्या फटक्याबाबत बोलताना कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतात व आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवतोय. मात्र, तूर्त कोरोनाच्या परिस्थितीवर मात करणं हे ध्येय आहे,’ असं कदम म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

