Share

पाथरी बसस्थानक परिसरातून चार किलो गांजा जप्त

Published On: 

परभणी : येथील बसस्थानक परिसरातून पाथरी पोलिसांनी कारवाई करत गांजा जप्त केला. 4.80 किलो असलेला हा गांजा 23 हजार रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन सैदाने यांना बसस्थानकात एक महिला गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी सहायक फौजदार पठाण, कर्मचारी शेख अलीम, थोरे, शेख, महिला पोलीस कर्मचारी अहिरे यांच्यासह सापळा रचला.

बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पोलिस निरीक्षक सैदाने हे अन्य कर्मचाऱ्यांसह बसस्थानक परिसरात दाखल झाले. त्यावेळी बसस्थानकात एक महिलेच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी तिला हटकले. चौकशी केली असता महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांचा संशय बळावल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यामार्फत त्या महिलेची झडती घेतली असता तिच्याजवळ 4 किलो 80 ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी गांजा जप्त करत त्या महिलेस ताब्यात घेतले. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!