Share

श्रीतुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दीच्या दिवशी तीस हजार मोफत दर्शन पास देण्याचा निर्णय

Published On: 

तुळजापूर – श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्तांच्या गुरुवार दि २८रोजी झालेल्या बैठकीत गर्दीच्या दिवशी तीस हजार मोफत दर्शन पास व पेड दर्शन प्रतिभाविक दोनशे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नगराध्यक्ष तथा विश्वस्त सचिन रोचकरींनी याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे आता आता जास्तीत जास्त भाविकांना देवीदर्शनाचा लाभ मिळणार आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त आ राणा जगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी खैरमाटे तसेच तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत बैठक होवुन त्यात सतरा विषयांपैकी बहुतांशी विषयांवर निर्णय घेण्यात आला.

कोरोना पार्श्वभूमीवर सध्या भाविकांना प्रतिदिन बारा हजार भक्तांना मोफत दर्शन पासेस वितरीत होते यावर आमदार राणा जगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी मोफत जादा पासेस वितरीत करण्याची मागणी केली असता यावार चर्चा होवुन आता इतर दिवशी वीस हजार व गर्दीचा दिवशी तीस हजार मोफत दर्शन पासेस वितरीत करण्याचा निर्णय झाला.

पेडदर्शन प्रतिभाविक तिनशे ऐवजी दोनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच देविचे धार्मिक विधी सुरु करण्याबाबतीत १५ फेबुवारी पर्यत निर्णय घेण्याचे ठरले.श्रीतुळजाभवानी मंदीरात पदनिर्मिती बाबतीत चर्चा होवुन उपजिल्हाधिकारी दर्जाचा सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेल्या अधिकारी घेण्याबाबतीत चर्चा होऊन हे पद शासन मान्यते नुसार भरण्याचा निर्णय झाला.

सुरक्षारक्षक कंपनी बीव्हीजी येथे काम करण्यास तयार नाही त्याऐवजी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ( मेस्को )व महाराष्ट्र सेक्युरेटी प्रा ली चे सुरक्षा रक्षक घेण्यावर चर्चा झाली व यावर पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले. श्रीतुळजाभवानी आभियांञिकी महाविधालयास भौतिक सुविधेसाठी आजपर्यत अठ्ठावीस कोटी दिले असुन पगारीसाठी आणखी ऐका कोटीची मागणी होत आहे यावर ही सखोल चर्चा झाली.

मंदीर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक 2 कोटी 20 लाख रुपये द्यावे लागणार आहेत यावरही चर्चा झाली.तसेच आकृतीबंद नुसार व्यवस्थापक सरव्यवस्थापक रोखपाल भांडारपाल सह अन्य पदे भरण्या बाबतीत चर्चा होवुन यावर पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले
दरम्यान,श्रीतुळजाभवानी मंदीरसाठी पाच किंवा तीन विधीज्ञ समिती कार्यान्वित करण्या बाबतीत चर्चा झाली . श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सैनिक शाळा व मंदीर येथील कार्यरत असणारे कर्मचारी अदलाबदलाचा अधिकारी तहसिलदार यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा वतीनै तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सुपरस्पँशालिस्ट हाँस्पीटल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्या बाबतीत चर्चा होवुन यावर पुढील बैठकीत आणखी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळातील मंदीराचा जमाखर्च आढावा घेतला असता जमा ८ कोटी ९१लाख झाले तर खर्च ८ कोटी ९७ लाख रुपये झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!