Share

रोहितच्या गैरहजेरीत विराटची भूमिका महत्वाची; पाकिस्तानचा माजी कर्णधाराची प्रतिक्रिया

Published On: 

नवी दिल्ली : टीम इंडियात (Team India)  कर्णधारपदाच्या विभाजनावरून सुरू असलेल्या गदारोळात भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अडचणीत सापडेल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी सलामीवीर आणि कर्णधार सलमान बट्टने (Salman Butt) व्यक्त केला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौरा विराटसाठी महत्त्वाचा असल्याचे त्याने म्हंटले आहे.

सलमान बटच्या मते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. खराब फॉर्ममध्ये असूनही विराट कोहलीने या मालिकेत चांगली कामगिरी करावी, असा विश्वास त्याने विराट कोहलीवर व्यक्त केला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेबद्दल सलमान बटने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हंटले की, ‘दिग्गज खेळाडू रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आता कर्णधार आणि खेळाडू म्हणून विराट कोहलीची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या COVID-19 प्रकरणांमुळे आगामी दक्षिण आफ्रिका-भारत मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!