Share

छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

परभणी: सध्या राज्यात आरक्षणावरून राजकीय वाद सुरु असतानाच रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. ‘मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर मराठ्यांचं आरक्षण का गेलं? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. पण आमच्या तथाकथीत लोकांना वाटलं आमचं गावचं लई मोठं आहे. आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज काय अवस्था झाली आहे. असे वादग्रस्त वक्तव्य महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले आहे.

माझे ३० ते ३५ आमदार निवडून द्या, अवघ्या १० मिनिटांत ओबीसींची गंमत करून दाखवतो. मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो, असेही महादेव जानकर म्हणाले आहेत. ते परभणी येथील गंगाखेड या ठिकाणी ओबीसी एल्गार आंदोलनात बोलत होते.

या देशात मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम, अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम, कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम, कुठं कलेक्टर नाही. बोंबाबोंब आहे. राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे, असंही जानकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!