🕒 1 min read
पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
कोरोनाच्या संभाव्या तिसर्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे महापालिकेने कोरोना बाधित लहान मुलांवर उपचारासाठी पुढाकार घेत येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडस्चा स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की ते उद्या शहरातील बालरोग तज्ज्ञांशी ऑनलाईन चर्चा करणार आहेत. ‘कोरोना व अन्य आजारांसंबधित त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जाईल. लहान मुले कोरोनाच्या लाटेपासून दूर राहातील, याचदृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच, बाधित झालेल्या मुलांवरील उपचार व लसीकरण यादृष्टीने परिस्थिती हाताळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल.’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या पुण्यात राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. त्यामुळे लोकांनी महत्वाची कामे असतील तर ती सकाळी ११ वाजण्याच्या आतच पूर्ण करावी. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पिंपरी-चिंचवड महापालिका थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्यास तयार; टोपेंनी परवानगी द्यावी’
- पुणेकरांनो सकाळी ११ नंतर घराबाहेर पडाल तर खबरदार; लॉकडाऊन होणार आणखी कडक
- महाराष्ट्र जिंकणार : राज्यात आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा ४० हजारांखाली !
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

