औरंगाबाद : आ. शिरसाट यांच्यावर विकास कामाचे उदघाटन केल्या प्रकरणी मागच्या महिन्यात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आ. संजय शिरसाट यांच्यावर कारवाईकडे सर्वांचे लक्ष असतांना पोलिस मात्र, उदासीन दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी ते शहरात नासलाचे सांगितले होते.
वाळूज येथे आ. संजय शिरसाट यांनी त्यांच्या विकास निधीतून ड्रेनेजलाईनचे काम सुरू करण्यासाठी, त्या कामाचे थाटात उदघाटन केले होते. नागरिकांच्या टिकेनंतर दोन दिवसांनी त्यांच्यासह १८-२० लोकांवर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्वसामान्यांसाठी पोलीस कारवाईला तत्पर असते. मात्र, दोन आठवडे उलटून देखील त्यांच्यावर कोणत्याच प्रकारच्या कारवाईची हालचाल पोलिसांनी केली नाही.
याप्रकरणी तापसी अधिकारी यांना या आधी विचारणा केली असता, त्यांनी आ. शिरसाट शहरात नसल्याचे सांगितले. परंतु, सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आ. शिरसाट यांनी हजेरी लावली असताना. ते पोलिसांना मिळून आले नाही. त्यामुळे आ. शिरसाट यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उदासीन असल्याची चर्चा नागरिकांमध्ये पाहायला मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

