मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. सध्या भारताच्या या स्टार खेळाडूचे इंस्टाग्रामवर २०० दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. हा टप्पा गाठल्यानंतर विराटने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या खास पोस्टद्वारे लोकांचे आभार व्यक्त करताना कोहलीने चाहत्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंपैकी एक भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. त्याचे फेसबुकवर ४९ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर विराटचे ट्विटरवर ४८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मागील वर्षीच्या सुरुवातीला कोहलीने इंस्टाग्रामवर १५० दशलक्ष फॉलोअर्स मिळवणारा पहिला आशियाई सेलिब्रिटी बनून त्याने इतिहास रचला होता. इंस्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोअर्सनंतर त्याने ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारला मागे टाकले आहे.
Another double for @imVkohli and this time on Instagram, making him the third most followed athlete in the world. ????????#PlayBold #WeAreChallengers #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/N3DRsIICHL
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 7, 2022
फॉलोअर्सच्या बाबतीत जगातील तिसरा अॅथलीट
सर्वाधिक फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर या बाबतीत विराट कोहली जगातील तिसरा अॅथलीट बनला आहे. पोर्तुगालचा स्टार फुबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ४५० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर अर्जेंटिनाचा स्टार फटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ३३४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यानंतर आता तिसऱ्या स्थानावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कब्जा केला आहे.
विराट कोहली ९ जूनपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही. या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेतून विराटशिवाय कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:

