चेन्नई : येत्या ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहली याने पहिल्या सामन्यानंतर पालकत्त्व रजा घेतली होती. कोहलीच्या जागी रहाणेने भारतीय संघाची धुरा सांभाळली होती.
परंतु विराट आता संघात परतला आहे. विलगीकरण काळानंतर भारतीय संघ मंगळवार २ फेब्रुवारी पासून मैदानात सरावासाठी उतरला आहे. अशातच भारतीय संघ आणि कोहली मैदानावर मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा मैदानात सराव करत असतानाचा एक गमतीशीर व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू धावताना, फुटबॉल खेळताना तर, कर्णधार विराट हा माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याच्या प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटची नक्कल करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांनी भरपूर कमेंट सुद्धा केल्या आहेत.
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असणार आहे. भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे.
Team bonding ????????
Regroup after quarantine ✅
A game of footvolley ????#TeamIndia enjoys a fun outing at Chepauk ahead of the first Test against England. ???????? – by @RajalArora #INDvENGWatch the full video ???????? https://t.co/fp19jq1ZTI pic.twitter.com/wWLAhZcdZk
— BCCI (@BCCI) February 2, 2021
महत्वच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- धक्कादायक! एचआयव्हीबाधीत ५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले; मुख्याध्यापकाकडून आरोपाचे खंडण
- शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणाला…
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- शहरातील रस्त्यावरुन उच्च न्यायालयाने मनपाला ठणकावले

