🕒 1 min read
मुंबई – एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झालेले असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांमुळे रुग्ण पुरते हवालदील झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उपचार घ्यायला गेलेले रुग्ण सुरक्षित आहेत कि नाही असा सवाल उपस्थित करण्यासारखी परिस्थिती गेल्या काही दिवसात घडत असलेल्या घटनांमुळे निर्माण झाली आहे.
दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचां प्राम गमवावे लागल्यानंतर आज विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 17 रुग्ण अडकले होते. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.
#WATCH Virar fire incident, not national news…says Maharashtra Health Minister Rajesh Tope
13 people have lost their lives in a fire incident at Vijay Vallabh COVID care hospital in Maharashtra's Virar pic.twitter.com/hNZEHIbnLp
— ANI (@ANI) April 23, 2021
दरम्यान, विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला ही राष्ट्रीय बातमी नाही, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असं म्हटले. “पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडिसिविरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत,” असं टोपेंनी सांगितले.
राज्यात निष्पाप लोक होरपळून मरताहेत एकापाठोपाोठ एक अग्नीकांड सुरू आहेत
माणसं हवालदिल झालीत त्यांना आधाराची गरज आहे
आरोग्यमंत्री @rajeshtope11 मात्र #VirarFire घटना”नॅशनल न्यूज”नाही म्हणत जखमेवर मीठ चोळायचं काम करताहेत किती असंवेदनशीलता
मायबाप सरकारची ही प्रतिक्रीया दुदैवी आहे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 23, 2021
राजेश टोपेंच्या या वक्तव्यावर भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. राज्यात निष्पाप लोक होरपळून मरताहेत एकापाठोपाोठ एक अग्नीकांड सुरू आहेत माणसं हवालदिल झाली आहेत. त्यांना आधाराची गरज आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र विरार मधील घटना”नॅशनल न्यूज”नाही म्हणत जखमेवर मीठ चोळायचं काम करताहेत. किती असंवेदनशीलता मायबाप सरकारची. ही प्रतिक्रीया दुदैवी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
