Share

पुणेकरांनो काळजी घ्या ! शहरात आज ३३१ नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

पुणे : पुणे शहरात आज नव्याने ३३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ५८२ इतकी झाली आहे. शहरातील २७७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७० हजार ९९७ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ०९९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २७ लाख ५४ हजार ९७६ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ९१७ रुग्णांपैकी २२७ रुग्ण गंभीर तर ५१८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ६६८ इतकी झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात असताना कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण, जुलै महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही’ असे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!