औरंंगाबाद : जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्ल्ांघन करून वाळूज-पंढरपुर येथे हायमास्ट लाईटचे उद्घाटन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य रमेश गायकवाड यांच्यासह पंढरपुरच्या सरपंच, उपसरपंचावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आणि संचारबंदी लागू असतांना देखील १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारस पंढरपुर येथे जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य रमेश गायकवाड यांच्या हस्ते हायमास्ट लाईटचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पंढरपुरच्या सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख अख्तर, माजी सरपंच शेख अख्तर, मेहबुब चौधरी, के.व्ही.गायकवाड, माजी उपसरपंच महेंद्र खोतकर, जावेद शेख, ग्रामविकास अधिकारी हरिष आंधळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दम जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य रमेश गायकवाड यांच्यासह पंढरपुरच्या आजी-माजी सरपंच, उपसरपंचाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संकटात भर : चक्रीवादळाचा कोकणासह मुंबईतील ऑक्सिजन प्रकल्पांना धोका; सतर्कतेचे आदेश
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- ‘मराठा आंदोलने होऊ नये म्हणून कोरोनाचे निर्बंध, भाजप आंदोलनात भाग घेणार’
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- औरंगाबादेत शिवसेना-एमआयएमच्या वादात प्रलंबित राहिलेल्या ‘या’ कामास मिळाली गती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

