Share

विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे(Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देत उमेदवारी नाकारली तरी संयम दाखविल्याने चांगले फळ कसे मिळते, याचे हे उदाहरण आहे, असे तावडे म्हणाले.

भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा(Jagatprakash Nadda) यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करताना तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविली आहे. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजप सरचिटणीसपदी नियुक्ती झालेले तावडे हे महाराष्ट्रातील पहिलेच नेते आहेत. नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि लोकसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती.

दरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर नेत्यांकडून संयम पाळला जात नाही. मला उमेदवारी नाकारल्यावर मी म्हटले होते की, मला भाजपचा प्रदेश सरचिटणीस केले होते, तेव्हा बरे वाटले होते. विधान परिषदेवर निवडून आलो आणि विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. मंत्री झाल्यावर आठ खाती एकटा सांभाळत होतो, ज्यासाठी या सरकारमध्ये आठ मंत्री आहेत; पण ही जबाबदारी सांभाळताना खूप चांगले वाटत होते. त्यामुळे एखादे वेळी तिकीट मिळाले नाही, तर मी आता पक्ष सोडतो, वगरे म्हणणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वभावात नाही. मी संयम दाखविला. जे काम दिले जाईल ते प्रामाणिकपणे करायचे. मग तुमची दखल नक्की घेतली जाते. हे मात्र आजच्या माझ्या उदाहरणावरून कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट झाले असेल, असेही तावडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!