मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
‘एव्हढी मस्ती ?, महाराजांबद्दलच बेगडी प्रेम आम्हाला माहीत आहे भाजपाच्या बेडकांनो’
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजयसिंह पंडित यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘जय भवानी..!! जय शिवाजी..!! हे मराठी माणसाला ऊर्जा देणारा जयघोष देशाच्या सभागृहात चालणार नाही राज्यसभा शपथग्रहण वेळी व्यंकय्या नायडु यांच्याकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना समज.! एकीकडे महाराजांसारखी दाढी वाडवून त्यांची बरोबरी करायची आणि दुसरीकडे त्यांचा नावाला विरोध करायचा हे खपवून घेतल जाणार नाही मग तो कोणीही असो’. अस ट्विट करत त्यांनी भाजपवर आणि थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
‘निवडणुकीच्या प्रचारात ‘छत्रपतींचा आशीर्वाद’, अन् छत्रपतींच्या आशीर्वादाने शपथ घेतली तर अडचण’
जय भवानी..!! जय शिवाजी..!! हे मराठी माणसाला ऊर्जा देणारा जयघोष देशाच्या सभागृहात चालणार नाही राज्यसभा शपथग्रहण वेळी व्यंकय्या नायडु यांच्याकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना समज.! pic.twitter.com/z1yPiiFrLM
— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) July 22, 2020
सारथीच्या बैठकीचा विनाकारण वाद निर्माण करणाऱ्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या अंधभक्तांना याबद्दल काय वाटते !
— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) July 22, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

