Share

‘एव्हढी मस्ती ?, महाराजांबद्दलच बेगडी प्रेम आम्हाला माहीत आहे भाजपाच्या बेडकांनो’

Published On: 

मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे.  सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

‘निवडणुकीच्या प्रचारात ‘छत्रपतींचा आशीर्वाद’, अन् छत्रपतींच्या आशीर्वादाने शपथ घेतली तर अडचण’

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. आता कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘एव्हढी मस्ती ? छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आई भवानी चे नाव घेतलेल तुम्हाला चालणार नाही, तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बेगडी प्रेम आम्हाला माहीत आहे भाजपा च्या बेडकांनो. तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू चा जाहीर निषेध’. अस ट्विट करत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

व्यंकय्या नायडूंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहून पाठवणार २० लाख पोस्ट कार्ड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!