Share

भाजपने राणेंसारख्या विकृतीला स्वीकारले, त्यांचा पराभव करणारचं – शिवसेना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – भाजपने अगदी शेवटच्या क्षणी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना भाजपात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपच्या या निर्णयानंतर शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार उभा केला. यामुळे महायुती असून देखील नितेश राणे यांना शिवसेनेशीचं लढाव लागणार आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रवेश दिल्याने भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी शिवसेनेचे दुश्मन असलेल्या राणेंना तिकिट देवू नका अशी भाजपला वारंवार विनंती केली होती. नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार होवू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असंही शिवसेनेने स्पष्ट केलं होतं. मात्र, दुर्दैवाने भाजपने या विकृतीला स्वीकारलं असं ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना राऊत यांनी राणेंना सापाची उपमा दिली. त्यांनी ‘साप हा साप असतो. तो ढंख मारणारच. नितेश राणे शिवसेनेवर काही बोलणार नसले, तरी आम्हाला फरक पडत नाही. त्यांनी पुतणामावशीचं हे प्रेम दाखवू नये अशा शब्दात नितेश राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेना भाजप युती झाली, नारायण राणे बऱ्याच अंशी भाजपात आले, तरी सिंधुदुर्गात शिवसेना आणि राणे या पारंपारीक स्पर्धकातच संघर्ष होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. कधीकाळी राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत सर्वाधिक चुरशीची लढत होणार आहे. राणेंसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कोणीही निवडून आला तरी सरशी मात्र युतीचीचं होईल अशी आजची स्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181805148063948800?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181799983156092928?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!