Share

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल जुनं झालंय, प्रशांत किशोर यांचे परखड मत

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुले राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या असतानाच काल ( २१ जून ) रोजी पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. पवार-किशोर यांची ही दुसरी भेट असून या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर खलबतं झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

आता शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज ( २२ जून ) ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस वगळून इतर विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलंय. यजमान म्हणून शरद पवार हेच या बैठकीचं नेतृत्व करणार असल्याचं समजलं जातंय.

मात्र, बैठकीपूर्वी ‘ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नसल्याचं’ स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर या बैठकीत राजकीय नेत्यांव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर काही प्रसिद्ध व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आलंय. दुसरीकडे या बैठकीत कॉंग्रेसचा एकही नेता सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’च्या छत्राखाली होत असलेली ही बैठक कॉंग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.

देशात सुरु असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चांवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी परखड भाष्य केले आहे. ‘तिसऱ्या आघाडीचं मॉडेल वापरून झालं आहे. हे मॉडेल जुनं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला हे मॉडेल अनुकूल नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शरद पवारांशी झालेली भेट, त्याचे काढण्यात आलेले राजकीय अर्थ यावरही त्यांनी भाष्य केलं. पवारांची भेट घेतली. एकमेकांना जाणून घेण्यासाठी ही भेट होती. आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!