🕒 1 min read
मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असते. यावेळी देखील तिच्या एका वक्तव्यामुळे तिची पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राखीचा मुंबईच्या रस्त्यावरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात राखी चक्क रस्त्यावर एका रिक्षाचालकाला डान्स शिकवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/CQX7-cjFrE4/?utm_source=ig_web_copy_link
राखीचा हा व्हिडीओ तिच्या गाण्याच्या प्रमोशनचा आहे. अलीकडे राखीचा ‘तेरे ड्रिम में मेरी एंट्री’ हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. राखीने यात दमदार डान्स केला आहे.गाण्याला लाखो लोकांनी ते पाहिल आहे. सध्या तिने आनंदात रिक्षावाल्या काकांना नाचायला भाग पाडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्स येत आहेत. तर अनेकांनी तिचे ही व्हिडीओ पाहून कौतुकही केले आहे.
काही दिवसापूर्वीच राखीने एक व्हिडीओ शेअर करत ‘मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता तुम्ही माझ्या आगामी व्हिडीओची वाट पाहा’ असे कॅप्शन दिले होते. तसेच कोरोना लस घेताना तिने नर्सला विनंती करत ‘तेरे ड्रिम में मेरी एंट्री’ हे गाणे देखील गात असल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडीयावर चांगलाच चर्चेत आला होता.
महत्वाच्या बातम्या
- आज पवारांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक, कॉंग्रेसला सोडून तिसऱ्या आघाडीसाठी हालचाल ?
- रिक्षा चालक ते रिअल इस्टेट किंग…अविनाश भोसले यांचा थक्क करणारा प्रवास
- ‘मेरे दो अनमोल रतन’; प्राजक्ता माळी भाच्यांसोबत घालवते सुट्टीचा आंनद
- कोरोना संसर्गाच्या साथीत ऑलिम्पिक स्पर्धेत ‘कंडोम’ वाटपाचा अट्टहास
- अखेर अॅडम झाम्पा बोहल्यावर चढला; कोरोनामुळे रखडला होता विवाह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
