Share

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर बीड जिल्हयातील ७३ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजूरी

Published On: 

🕒 1 min read

बीड: गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख महामार्ग व रस्त्यांनी कात टाकली. मात्र, ग्रामीण भागासाठी उपयुक्त असलेल्या रस्त्यांना विकासाची प्रतीक्षा होती. यापैकी सात ठिकाणच्या रस्ता व पुलांच्या कामाबाबत खासदार डॉ. मुंडे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र देऊन निधी देण्याची मागणी केली होती. शिवाय गडकरी यांची भेटही घेतली होती. त्यानुसार शुक्रवारी सीआरएफ निधीतून या रस्ता कामांना मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी व पुलांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ७३ कोटी ७२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. सीआरएफअंतर्गत या सात रस्त्यांच्या कामांना निधी देण्यात आला असून नव्याने होणारे रस्ते व पुलांच्या कामामुळे जिल्ह्यातील दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे.

टोकवाडी-नागापूर-बोधेगाव रोडवर नागापूर येथील वाण नदीपात्रात पुल उभारण्याच्या कामासाठी ४.४६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अनेक दिवसांपासून नागरिकांतून या पुलाच्या कामाची मागणी होत होती. तसेच साक्षाळपिंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड एमआयडीसी-कुर्ला रोडच्या दुरुस्तीसाठी ३.८८ कोटी रुपये, जिल्हा हद्द असलेल्या हातोळण-परोडी, वाहिरा-घुमरी-कानडी-शिराळ-आष्टी रोडसाठी ३.८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. हिंगणी-अमला-खानापूर-बोधेगाव-साेनहिवरा रोडवर अमला गावानजीक पुल उभारणीसाठी ३.९५ कोटी रुपये, गोपत पिंपळगावनजीक गोदावरी नदीवर पुल उभारण्यासाठी ३४.१० कोटी रुपये, देवगाव-विडा-धारूर (कासारी फाटा) या रस्ता दुरुस्तीसाठी ९.९१ कोटी रुपये प्राप्त झाले. तर विडा-पिंपळगाव ते सांगवी-एकुरका, राजेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १४.८४ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे.

जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार सीआरएफअंतर्गत होणाऱ्या पुल व रस्त्यांच्या कामामुळे ग्रामीण व शहरी भागातील वाहतुकीला गती मिळेल. यापुढेही जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांसह कोविड काळातील आवश्यक उपाययोजनांसाठी निश्चितपणे पाठपुरावा सुरू राहील, अशी माहीत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी डली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!