Share

गंगापूर कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती ओढावल्याचा ग्रामस्थांचा आरोप!

Published On: 

🕒 1 min read

गंगापूर : गंगापुर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्नांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आरोग्य विभागासह महसूल, पोलीस प्रशासन, ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे हि परिस्थिती ओढावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कागदावरच कारवाई दाखवल्यामुळे तसेच कोरोनाची तपासणी न करता थातूर मातूर डाॅक्टरांकडून उपचार घेणाऱ्यांमुळे संसर्ग वाढत आहे. शासकीय रुग्णालयात दाखल होण्याची भीती यामुळे अनेक रुग्ण तपासणी करण्यास धजावत नाही.  कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्यामुळे मांजरी व सावखेडा तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

गंगापुर तालूक्यामध्ये गोदावरी पट्ट्यातील गावामध्ये कोरोना रोगाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. वाड्या वस्तीत कुटूंबेच्या कुटूंब बाधित आढळून येत आहेत. यात प्रामुख्याने वाहेगाव मांजरी माहुली सावखेडा या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. यात कोरोनामुळे आठ ते दहा लोकांनी जीव गमावला आहे. यातील काही रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना रुणांची साखळी तोडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्येक खेड्यामध्ये वाड्या वस्त्यावर कोरोना रोगाची चाचणी केली जावी यात अँन्टीजेन, आरटीपीसीआर, एचआरसीटी स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे.

परंतु याची चाचणी वरीलप्रमाणे होतांना दिसत नाही. सर्व जबाबदारी आरोग्य विभाग, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी मदतनीस शिक्षक यांच्यावर आहे. परंतु संबंधित विभागाचे कर्मचारी बघ्याची भुमीका घेऊन कागदावरच अहवाल सादर करुन वरीष्ठांना सादर करीत आहे. याकरीता तातडीने वरीष्ठांनी शासनाच्या नियमाप्रमाणे पावले उचलणे गरजेचे आहे. मांजरी येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रास प्रशिक्षित डाॅक्टर व नर्सची नेमणूक करावी. शासनाकडून लसीकरण कॅम्प घेण्यात यावेत अशी मागणी सरपंच अंजली कसाने उपसरपंच अप्पा मुळे यांनी ठरावाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

आजपासून तीन दिवस मांजरी हद्दीतील सर्व दुकाने व भाजीपाला विक्री बंद ठेवली आहे. कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता शासनाच्या नियमांचे पालन करावे मास्क वापरणे सुरक्षीत अंतर ठेवावे कोणत्याही प्रकारे शासनाच्या नियमांचे उलंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महत्त्वाच्या  बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!