Share

‘बावनकुळे यांना सत्तेत असताना चालवलेल्या अवैध धंद्यांची आठवण येत असावी’

Published On: 

नागपूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकाआघाडीच्या मंत्र्यांवर केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. असा धक्कादाय आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

तर, रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या अ़डवायच्या नाहीत, असा एसपी आणि कलेक्टरांना अलिखित आदेश देण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते बिनधास्त गाड्या चालवतील, असा कारभार चालला आहे. सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत. अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामधून मोठी कमाई केली जात आहे, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांनी केला.

यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांना सत्तेत असताना चालवलेल्या अवैध धंद्यांची आठवण येत असावी. बावनकुळे यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत. तसेच असे आरोप करताना भान ठेवावं, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!