Share

बाराक ओबामांच ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात रामायण-महाभारताचा उल्लेख!

Published On: 

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अ प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक पब्लिश झाल्या नंतर ह्या पुस्तकाची भारतातही खूप चर्चा झाली. सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल हे पुस्तक माझी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी नुकतेच पब्लिश केले आहे. भारतात या पुस्तकाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या पुस्तकात भारतीय राजकीय नेत्यांचा देखील उल्लेख केला गेला आहे. या पुस्तकामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याबाबतही उल्लेख केला गेला आहे.

या पुस्तकामध्ये राजकीय घडामोडींसह भारतीय संस्कृतीचा देखील उल्लेख केला आहे. ओबामा या पुस्तकात म्हणतात, आपले बालपण हे रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, ‘ भारत आणि तेथील संस्कृतीबद्दल आपल्या मनात कायम विशेष स्थान राहिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंडोनेशियामध्ये बालपण गेलं असून तिथे मी बालपणी रामायण, महाभारतामधील गोष्टी अनेकदा ऐकल्याचा उल्लेख ओबामांनी केला आहे.’

दरम्यान, या पुस्तकात राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे.

या पुस्तकावर भारतीय राज्यकीय नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, “परदेशी नेते भारतीय राजकीय नेत्यांविषयी अशी मतं व्यक्त करु शकत नाहीत. ओबामांच्या टिपण्णीवरुन भारतात सुरु झालेला राजकीय वादंगही अयोग्य आहे. आम्ही म्हणतो का ट्रम्प वेडे आहेत? ओबामांना भारताविषयी अशी कितीशी माहिती आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!