Share

#महाराष्ट्र_द्रोही : फडणवीसांचं आंदोलन म्हणजे स्वतःच घर सांभाळेना अन् हे निघाले गावाचा कारभार करायला !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाकरे सरकारविरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

यावर कॉंग्रेस नेते आणि मंत्री विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. कोरोनाच्या संकटात ज्यांनी मतदार संघाकडे डुंकूनही पाहिलं नाही.जे सरकार अस्थिर करण्यासाठी वारंवार मा.राज्यपालांकडे चकरा मारत होते. आज तेच फडणवीस महाराष्ट्र वाचण्याच्या गोष्टी करतायत. हे म्हणजे असं झालं. स्वतःच घर सांभाळेना अन् हे निघाले गावाचा कारभार करायला ! असा टोला वड्डेटीवार यांनी लगावला आहे.

आंदोलन करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्य केंद्राच्या परवानगीनुसार जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेऊ शकतं. असे असतानाही राज्य सरकार जनतेवर एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही. एकीकडे केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय. तर दिवसेंदिवस राज्य सरकार निष्क्रिय ठरत आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलन 

या आंदोलनचे पडसाद राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील उमटताना दिसले. औरंगाबाद , नागपूर, चंद्रपूर येथे भाजप समर्थकांनी आपल्या अंगणात उभे राहून सरकारच्या निष्क्रीयते विरोधात आंदोलन केले. हातात वेगवेगळ्या आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले. आंदोलन करते हातात फलक घेऊन शांत उभे होते. यामध्ये शेतकऱ्यांना मदत करा, सर्वसामान्यांना उपचार द्या यांना अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले. तर पुण्यातही भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी देखील आंदोलन केले.

भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही सहभाग घेतला. राज्य सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला. यावेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल या देखील उपस्थित होत्या. तर इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. यावेळी त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील हे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !

लढाई जिंकणार : कोरोना बरे झालेल्यांची विक्रमी संख्या; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले

केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा फडणवीसांच्या लक्षात आल्याने वेगळ्या पॅकेजची मागणी करतायत : पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!