🕒 1 min read
मुंबई:- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धनगर समाजासाठी सुरु केलेल्या योजना आघाडी सरकारने बंद केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच सरकारने जे आदिवासींसाठी ते धनगरांसाठी या न्यायाने तात्काळ धनगर समाजाला निधी उपलब्ध करुन देत योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. तसेच गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर धनगरविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांसाठी फडणवीस सरकारने 2018 मध्ये महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना सुरु केली होती. या योजनेत प्रत्येक तालुक्यातील 15-20 युवकांना मेंढ्या दिल्या जायच्या. यासाठी लाभार्थीने 47 हजार रुपये भरल्यानंतर 3 लाख रुपयांपर्यंतच्या शेळ्या आणि मेंढ्या या योजनेतून दिल्या जायच्या. मात्र, आघाडी सरकारच्या काळात मागील वर्षीच्या मागणीधारकांना देखील हा निधी देण्यात आला नाही. या वर्षी देखील या योजनासाठी काहीही तरतूद नाही, असे पडळकर म्हणाले.
यावरून हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचं दिसतंय. यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना पुन्हा सुरु करावी. तसेच यावर्षी आदिवासींना 8 हजार 853 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यापटीत धनगरांनाही निधी द्यावा, अशी मागणीही पडळकरांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- ब्रिटननंतर आता ‘या’ देशाने दिली फायझर लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- शेतकरी संघटनांशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारची दारे सदैव खुली आहेत – नरेंद्र सिंह तोमर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
