पुणे : एमपीएसीसी परीक्षा घेण्यास मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यासोबत राज्य सरकारने घोषित केलेली तथाकथित मेगा भरती देखील अद्याप प्रतीक्षेतच ठेवण्यात आली. याविषयी अजूनही राज्य सरकारने कोणतंही पाऊल उचललेलं नाही.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले आणि एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला मात्र आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
या पार्शभूमीवर एमपीएससी विद्यार्थी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून मागणी करणारे शिक्षक यांच्या प्रश्नावर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी अनेकदा आंदोलने करत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर जानेवारी अखेरपर्यंत रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग होण्याचे विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत देखील दिले आहेत.
यावेळी ओबीसी नेते बाळासाहेब सानप सोमनाथ, प्रा. लक्ष्मण हाके, उपस्थित होते. त्याचवेळी भटक्या आणि विमुक्त जातिंकरता न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देत एमपीएससी तून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशाने शेतीसाठी किती योगदान दिलं?’ नितीन गडकरींचा सवाल
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णा हजारेंचे उपोषण निश्चित
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- मोठी बातमी : भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या खडसेंना अखेर ईडीची नोटीस मिळाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
