नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी 13 व्या आवृत्तीसाठी संघ संयुक्त अरब अमिरातीसाठी (युएई) रवाना होत आहेत. या दरम्यान, दोन भारतीय खेळाडूंनी आपला साखरपुडा जाहीर केला. अलीकडेच युजवेंद्र सिंह चहलने धनश्री वर्मासोबत साखरपुड्याची घोषणा केली आणि आता भारतीय अष्टपैलू विजय शंकरनेही आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विजय शंकर आणि वैशाली विश्वेश्वरन यांचा साखरपुडा पार पडला असून त्याने इन्स्टाग्रामवर हे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या वर्षी वर्ल्डकप खेळलेल्या शंकरने आयपीएल 2020 साठी यूएईला रवाना होण्यापूर्वी साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. यानंतर चाहते आणि सहकारी खेळाडू यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या निवडीदरम्यान अंबाती रायुडूकडून बरीच टीका सहन करावी लागली. विजय शंकर ‘थ्रीडी’ प्लेयर असल्याचे मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले होते. मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला होता. या विश्वकरंडक स्पर्धेत विजयने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
महत्वाच्या बातम्या-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

