मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रीमंडळातील सन्माननीय मंत्री महोदयांनी पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी सोमवार दिनांक ३१ ऑगस्टपासून एक वेळ निश्चित केली आहे.
त्यानुसार सोमवारी दुपारी २ ते ४ यादरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. मंगळवारी सकाळी १० ते १२ यावेळेत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दुपारी २ ते ४ यावेळेत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, सायंकाळी ४ ते ६ यावेळेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटता येईल. बुधवारी सकाळी १० ते १२ यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. तर दुपारी २ ते ४ यादरम्यान मत्स्यविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे कार्यकर्त्यांना भेटू शकतील.
देशाच्या जडणघडणीत राजीव गांधींचे अमुल्य योगदान- निलम गो-हे
गुरुवारी सकाळी १० ते १२ यावेळेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची , दुपारी २ ते ४ यावेळेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची तर सायंकाळी ४ ते ६ यावेळेत कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेता येईल. शुक्रवारी सकाळी १० ते १२ यावेळेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची, दुपारी २ ते ४ यावेळेत युवक कल्याण व फलोत्पादन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची तर सायंकाळी ४ ते ६ यावेळेत पर्यावरण, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
‘महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते’


