Share

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू

Published On: 

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय सचिवालयाने अशा आशयाची माहिती सरकारला दिली आहे. त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ तारखेला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच फेसबुकचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये चीनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावरही विरोधक आक्रमक असून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात येत आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची तयारी सुरू असून अधिवेशन दोन आठवड्यांचे असेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांच्या वेळा वेगवेगळ्या असतील. तसेच बैठकीसाठी दोन्ही सदनांचा उपयोग करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

बाप्पा महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढ, निलेश लंकेंची गणरायाला भावनिक साद !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!