Share

विद्युत जामवालने केले भारतीय फुटबॉलला समर्थन करण्याचे आवाहन….

Published On: 

मुंबई : भारतात सर्वाधीक लोकप्रीय खेळ म्हणून क्रिकेटला महत्व दिले जाते. क्रिकेटचा चाहता वर्ग आणि ग्लॅमर भारतात अफाट आहे. त्यामानाने फुटबॉल दुरपर्यंत कुठेच नाही. क्रिकेटला भारतात धर्माच्या पलीकडे स्थान देण्यात आले आहे.

मात्र क्रिकेटशी तुलना करता भारतात इतर खेळाकडे साफ दुर्लक्ष होत. यातच काही दिवसापुर्वी पार पडलेल्या युरोकप आणि कोपा अमेरीका फुटबॉल स्पर्धेत विजयी संघाचे भारतीय चाहत्यांनी खुप अभिनंदन केले. मात्र भारतीय फुटबॉलसाठी अशी भावना भारतीय प्रेक्षक नाही दाखवत हाच धागा धरत बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवालने एक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय फुटबॉलला समर्थन करण्याचे आव्हान केले आहे.

विद्युत जामवालने एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतील व्यक्तीच्या हातात एक पोस्टर दिसून येत आहे, ज्यात लिहले आहे, ‘भारतीय फुटबॉलला समर्थन करा ज्या प्रकारे मेस्सी , रोनाल्डो सारख्या खेळाडूंना केले जाते’ काही वर्षांपूर्वी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने प्रेक्षकांना स्टेडियमवर येऊन मॅच बघण्याचे आवाहन केले होते.त्यावेळी प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर परत प्रेक्षकांनी या खेळाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. जर मेस्सी ,रोनाल्डोसारख्या खेळाडूंना समर्थन दिले जाते तर भारतीय खेळाडूंना का नाही, हा प्रश्नही याद्वारे उभा होतो.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!