Share

शिवाजीराव देशमुखांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजप-सेनेचा विजय पक्का ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी ७ जूनला पोटनिवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

विधानसभेतील आमदार या पोटनिवडणुकीत मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळामुळे ही लढत एकतर्फी होऊन सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या महायुतीला ही जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना-भाजप महायुती ही काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वरचढ ठरणार आहे. येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. काँग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सात अपक्ष, तर छोट्या पक्षांचे 13 आमदार आहेत.

विधानसभेतील संख्याबळ

भाजप – 122

शिवसेना – 63

काँग्रेसचे – 42

राष्ट्रवादी – 41

शेकाप – 03

बविआ – 03

एमआयएम – 02

मनसे – 01

सप – 01

भारिप – 01

माकप – 01

रासप – 01

अपक्ष – 07

एकूण – 288

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!