नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात प्राणपणाने आंदोलन करत आहेत. त्याच वेळी नेतेमंडळींना मात्र राजकीय काथ्याकूट करण्यात व्यग्र आहेत. शेतकरी आंदोलनाला मदत करण्याच्या बहण्याने हास्यास्पद आणि गंभीर प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलकांना दारूचे वाटप करावे, असे आवाहन काँग्रेस नेत्या विद्या राणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विद्या राणी शेतकरी आंदोलनात दारू वाटपाविषयी बोलत आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की कॉंग्रेसचे काही उपस्थित नेते म्हणतात की, आम्ही अनेक ठिकाणी पदयात्रा काढू. ही पदयात्रा आपल्या कॉंग्रेस पक्षाला नवी उभारी देईल. यामुळे पक्षाचा एक नवा जन्म होईल.
काँग्रेस नेत्या म्हणाल्या, यावेळेस आपण पराभूत झाल्याने आपली जिद्द संपली, आपल्याला मिळालेले आंदोलन 26 तारखेलाच संपले होते, परंतु शेतकऱ्यांच्या दृढ निश्चयामुळे ते पुन्हा उभे राहिले. आणि इतके जोरदारपणे उभे राहिले की आपल्याला ते चालवायचे आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आपल्याला त्यांच्याबरोबर राहावे लागेल, त्यांना मदत करावी, जेणेकरून हे आंदोलन जिवंत राहील. कॉंग्रेसच्या नेत्याच्या व्हायरल झाल्याच्या व्हिडिओमध्ये त्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलनात दारू वाटण्यास सांगत आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते.
#WATCH: Haryana Congress leader Vidya Rani says, "…We'll take out a 'padyatra' in Jind. It'll give new direction & strength to Congress. It'll be reborn. Agitation has risen again as farmers are firm. Be it money, vegetables, liquor-we can contribute to them as we like.."(14.2) pic.twitter.com/FwX7aGNHo9
— ANI (@ANI) February 15, 2021
व्हिडिओमध्ये विद्या राणी म्हणाल्या की, “प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या अन्नपाण्याची जेवढी होऊ शकेल तेवढी सोय केली आहे. मी असे म्हणणेन की, प्रत्येकाची जेवढी शक्ती असेल, मग तो पैसे दान करू शकतो, भाज्या दान करू शकतो, तुपाचे दान करू शकतो, दारूचेही दान करू शकतो. आपल्याकडून शक्य होईल तेवढे सहकार्य करा, आणि या आंदोलनाला चालना द्या. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचे नाही, तर हे आंदोलन आपल्या सर्वांचे आहे. याचा परिणाम आपल्या सर्वांवर होणार आहे.”
दरम्यान, विद्या राणी यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. आंदोलनात दारू वाटून काँग्रेसला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

