Share

VIDEO : बापरे बाप..! थोडक्यात वाचला इंग्लंडचा कॅप्टन; पिचवरच आडवा पडला बेन स्टोक्स!

Published On: 

मुंबई : सध्या आयपीएल (IPL)सोबत काऊंटी चॅम्पियनशिप (County Championship)चे सामने देखील सुरु आहेत. या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहम आणि ग्लेमोर्गन या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान या सामन्यात एक गंमतीदार किस्सा घडला आहे. यावेळी इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स खेळपट्टीवर चक्क झोपलेला दिसून आला.

क्रिकेटमध्ये चेंडू लागून अनेकवेळा वाईट घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बेन स्टोक्सला झोपलेला पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. पिचवर झोपलेल्याचा हा बेन स्टोक्सचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पिचवर नेमकं काय झालं ?

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मार्नस लाबुशेनने फेकलेला बॉऊन्सर चेंडू बेन स्टोक्सच्या कंबरेखाली नको त्या ठिकाणी लागला. त्यानंतर स्टोक्स अचानक खेळपट्टीवर झोपला. यादरम्यान स्टोक्सला काहीच दुखापत झाली नव्हती. तरीसुद्धा त्याने काही वेळ खेळपट्टीवर झोपून मैदानातील इतर खेळाडूंची मजा घेतली. मात्र स्टोक्सच्या अशा या वागण्याने मैदानातील परिस्थिती गंभीर बनली होती.

काऊंटी चॅम्पियनशिपच्या या सामन्यात बेन स्टोक्सने उत्तम फलंदाजी केली. त्याने ११० चेंडूमध्ये ८५ धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याच्या या खेळीमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!