मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या इमारतीचं ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यानंतर त्यांनी विदर्भातील जनतेला संबोधित करताना अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन देखील दिलं आहे. तर, यावेळी त्यांनी विदर्भात मजबूत असलेल्या भाजपला देखील टोले लगावले आहेत.
‘विदर्भ हा राज्याचा अविभाज्य घटक आहे. नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असा शब्द मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आहे.
दरम्यान, ‘सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे, असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे.’ असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला टोला लगावला आहे. नागपूरच्या अधिवेशनातच आपण शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. यासोबतच, गेली अनेक वर्षे नागपुरात देखील मुंबईप्रमाणे वर्षभर विधिमंडळाचं कार्यालय सुरु करावंअशी मागणी केली जात होती. ती आता पूर्ण होत असल्याने आनंद होत असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता; बाळासाहेब थोरात होणार पायउतार?
- भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या वापरावरून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी नोंदविला आक्षेप
- ‘औरंगाबाद हे नाव दुर्दैवी; शिवभक्तांच्या अस्मितेचा विचार करुन सरकारने निर्णय घ्यावा’
- विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये
- स्मार्ट योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये लातूर जिल्हा राज्यात अव्वल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

