लातूर :- राज्य शासनाने सन 2020-21 मध्ये बाळासाहेब ठाकरे कृषि व ग्रामीण परिवर्तन योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला गट यांना लाभ होणार आहे.
या सुवर्ण संधीचा पुरेपुर लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देवून त्यांचा परिपूर्ण विकास व परिवर्तन करण्याचा उदात्त हेतुने आत्मा व कृषि विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन प्रपत्रे भरण्याच्या शासनस्तरावरुन सुचना होत्या.
विशेष म्हणजे कोरोना काळात सुध्दा मागील आठ दिवसांपासून जिल्हयातील कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी हे शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांचे अर्ज दररोज रात्री 10.30 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन 754 प्रस्ताव सादर केले.
त्यांच्या या भरीव कामगीरीमुळे लातूर जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामांसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस.गावसाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प उपसंचालक आत्मा आर.एस.पाटील व बी.पी.किरवले तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांनी आहोरात्र राबून हा उद्देश साध्य केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- औरंगाबाद नामांतरामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल- रामदास आठवले
- पंतप्रधानांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा
- एखाद्या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून त्या जिल्ह्याला संभाजीनगर नाव द्या : सचिन खरात
- ‘मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन न उचलनारा मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देतो हे अतिशयोक्ती आहे’


