मुंबई : बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आज रविवारी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासुन त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
९८ वर्षीय दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयातील नॉन कोविड वार्डात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील महिन्यातही प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज नियमीत तपासणी आणि श्वास घ्यायला होत असलेल्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांची पत्नी जेष्ठ अभिनेत्री सायरा बानु यांनी ही माहिती दिली. यापुर्वी मे महिन्यातही दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी नियमीत वैद्यकीय तपासणी आणि काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात आणल्याचे सायरा बानु यांनी सांगितले होते. दिलीप कुमार हे बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.
महत्वाच्या बातम्या
- रायगडावरून संभाजीराजे कडाडले ; ‘मी मेलो तरी चालेल पण…’
- विनायक मेटेंच्या पुढील सर्व आंदोलनात भाजप सहभागी होणार-आशिष शेलार
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

