Share

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली, तर धार्मिक स्थळे पूर्णत: बंद

Published On: 

औरंगाबाद : बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला या पर्यटनस्थळांमध्ये सकाळच्या सत्रात एक हजार, दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेशाची अनुमती असणार आहे. साफ सफाई, सुरक्षितता व स्वच्छता तयारी आदी विशेष बाबींसाठी संबंधित पर्यटन स्थळे, स्मारके १६ जून रोजी खुले होतील. तर संबंधित पर्यटन स्थळे, स्मारके १७ जून सकाळी सहा वाजेपासून नागरिकांच्या सेवेत असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली. तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळांतर्गत येणारी जिल्ह्यातील धार्मिकस्थळे मात्र, पूर्णत: बंद राहतील, असेही ते म्हणाले.

पर्यटन स्थळे खुली आणि कोरोना रूग्णांची संख्या कमी जरी होत असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर, आवश्यकतेनुसार फेसशिल्डचा वापर करायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानुसार नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण राष्ट्रीय संरक्षित स्मारके व संग्रहालये उघडण्यात येतील, असे निर्देशीत केले आहे. त्यानुसार त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण व पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या संयुक्त स्वाक्षरीने कोविड-१९ संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमलबजावणीस्तव पूरक आदेश निर्गमित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!